Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यागंगापूर धरण ओव्हरफ्लो

गंगापूर धरण ओव्हरफ्लो

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिककरांची तहान भागविणारे गंगापूर धरण यंदा शंभर टक्के भरले आहे.

- Advertisement -

सन 1954 मध्ये गंगापूर धरण बांधून पूर्ण झाले. मागील 66 वर्षात सन 2009(79 टक्के)व2012 (86 टक्के) हा अपवाद वगळता गंगापूर धरण दरवर्षी शंभर टक्के भरुन ओव्हर फ्लो झाले आहे. गतवर्षी तर तब्बल महापूर आल्यामुळे तब्बल 15 गंगापूर धरण एवढे पाणी मराठवाडयाला विसर्ग करण्यात आले होते.

नाशिक शहराची लोकसंख्या 18 लाखाच्या पुढे गेली तरी गंगापूर धरण नागरिकांची तहान भागवत आहे. ब्रिटीश काळात गंगापूर धरण बांधकामास सुरुवात झाली.1954 साली धरण बांधून पूर्ण झाले. गंगापूर धरण बांधण्याचा इतिहास देखील रोचक आहे.

गंगापूर धरण बांधण्यापुर्वी नाशिककरांना नंदिनी नदीतून पाणी पुरवठा होत असे. बेळगाव ढगा येथे नंदिनीवर धरण देखील बांधले जाणार होते. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे धरण या ठिकाणी बांधण्यात आले नाही. दुसरा पर्याय म्हणून रामशेज किल्ला येथे उगम पावणार्‍या अरुणा नदीवर धरण बांधले जाणार होते.

मात्र, नंतर हे ठिकाणही रद्द करत गोदावरी नदीवर गंगापूर गाव येथे धरण बांधण्यात आले. धरणाचे वर असलेले त्र्यंबकेश्वर व अंबोली घाट परिसरात होणार्‍या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी धरण बांधण्यात आले. सन 1947 धरण बांधण्यास सुरुवात झाली.

तर सन 1954 मध्ये धरणाचा पहिला टप्पा बांधून पूर्ण झाला. धरणाच्या दुसर्‍या टप्प्याचे बांधकाम सन 1965 मध्ये पूर्ण झाले. धरण बांधण्यात आले तेव्हा त्याची क्षमता साडेसात टीएमसी इतकी होती. पण गाळामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होऊन साडेपाच टीएमसी इतकी आहे.

मागील 63 वर्षात हे धरण फक्त सन 2009 व 2012 या दोन वर्षात कमी पर्जन्यमानामुळे धरण शंभर टक्के भरु शकले नव्हते. या धरणातून नगरमधील गावे व मराठवाडयाची तहान भागविणारे महाकाय जायकवाडी धरणाला पाणी सोडले जाते.

मागील 66 वर्षात नाशिक प्रचंड विस्तारले. पण अजुनही गंगापूर धरण या शहराची तहान भागविण्यासाठी सक्षम आहे. दरवर्षी गंगापूर धरण ओव्हर फ्लो होते व नाशिककरांचा वर्षभराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटतो. धरण भरल्याने दरवर्षी छोटेमोठे पूर गोदेला येतात. गतवर्षी महापूर आल्यामुळे दहा ते पंधरा गंगापूर धरण भरेल एवढे पाणी जायकवाडिला गेले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या