Ganesh Utsav 2022 : 'शिवतीर्थ'वर पहिल्यांदाच बाप्पाचं आगमन; राज ठाकरे बनले फोटोग्राफर

Ganesh Utsav 2022 : 'शिवतीर्थ'वर पहिल्यांदाच बाप्पाचं आगमन; राज ठाकरे बनले फोटोग्राफर

मुंबई | Mumbai

करोना (COVID19) काळानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव (Ganesh Utsav 2022) धुमधडाक्यात साजारा होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नवे निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्थ'वर गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी गणरायाचे सहकुटुंब पूजन केले.

दरम्यान, राज ठाकरे, अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि घरातला सगळ्यात छोटा सदस्य किआन या तिघांनीही सारखेच कपडे घातले होते. यावेळी आजोबा राज ठाकरे आपल्या नातवासाठी फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसले. राज ठाकरे यांनी अमित, सून मिताली आणि नातू किआन या तिघांचेही आपल्या फोनमध्ये फोटो घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com