दुर्देवी घटना.. गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुण अभियंत्याचा पांझरेत बुडून मृत्यू

दुर्देवी घटना.. गणेश विसर्जनासाठी गेलेल्या
 तरुण अभियंत्याचा पांझरेत बुडून मृत्यू

धुळे Dhule

तालुक्यातील आनंदखेडा (Anandkheda) येथे अत्यंत दुर्दैवी(unfortunate incident) घटना घडली आहे. गणेश विसर्जनासाठी (Ganesha immersion) गेलेल्या इलेक्ट्रिक इंजिनियर (Electrical Engineer) असलेल्या तरुणाचा (youth) पांझरा नदीत (river Panzra) बुडून मृत्यू (drowning death) झाला आहे. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राकेश अशोक आव्हाड (वय 29, रा आनंदखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आज दि. 9 रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घरचा गणपती विसर्जनसाठी कुटुंबीयांसह गाव शिवारातील पांझरा नदीवर गेला होतो. त्या दरम्यान या ठिकाणी फरशी असलेल्या वाळुवरुन पाय घसरल्याने राकेश हा पाण्यात पडला.

फरशीपुलाच्या खाली असलेल्या सिमेंट पाईपात वाहून गेल्याने पाईपातील पाण्यात बुडाला. त्यामुळे कुटुंबियांनी एकच आरडाओरड केली. सुमारे 15 मिनिटांनी पाईपाच्या दुसऱ्या बाजुकडुन राकेश हा बेशुद्ध अवस्थेत बाहेर निघाल्याने त्यास कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले.

त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता तेथील डॉ.अरुणकुमार नागे यांनी तपासणी करून मृत घोषित केले.याबाबत रविकांत बापु सानप यांच्या माहितीवरून तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com