गणेशोत्सवकाळात रात्रीची संचारबंदी?

गणेशोत्सवकाळात रात्रीची संचारबंदी?

मुंबई

गणेश चतुर्थीला काहीच दिवस बाकी आहे. सगळीकडे खरेदीची लगबग सुरु झाली असल्याने गर्दी वाढत आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी (ganesh utsav)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)मोठा निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.

गणेशोत्सवकाळात रात्रीची संचारबंदी?
आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

राज्यात या आठवड्यात सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज आपत्ती व्यवस्थापनाची बैठक (meeting)बोलावली आहे. गणेशोत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेता या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी काय करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

विशेषतः गणपतीच्या काळात रात्री सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गर्दी होत असते. त्यातही मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये जास्त गर्दी होत असते. या गर्दीमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती सरकारला वाटते. त्यामुळे राज्यात गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या कालावधीसाठी नाईट कर्फ्यू (night curfew)लावायचा का याबाबतचा आपत्कालीन व्यवस्थापनाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

या जिल्ह्यांमुळे चिंता

राज्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. राज्य सरकारने रविवारी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील सात जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढलेली आहे. यामध्ये पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयांचा समावेश आहे. गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com