पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा; म्हणाले...

पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा; म्हणाले...

मुंबई | Mumbai

आज श्री गणेश चतुर्थी (Shri Ganesh Chaturthi) आहे अनेकजण आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं (Ganapati Bappa) आज घरोघरी आगमन होत आहे.

गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वर गणरायचा फोटो शेअर करत देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीटर वर त्यांनी एक श्लोक शेअर करत गणरायाची कृपा कायम राहो यासाठी प्रार्थना केली आहे.

यतो बुद्धिरज्ञाननाशो मुमुक्षोः, यतः सम्पदो भक्तसन्तोषिकाः स्युः। यतो विघ्ननाशो यतः कार्यसिद्धिः, सदा तं गणेशं नमामो भजामः।। गणेश चतुर्थी की ढेरों शुभकामनाएं। गणपति बाप्पा मोरया! असे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com