Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedPhoto चैतन्याचा महाउत्सव ! घरोघरी गणरायाचे आगमन

Photo चैतन्याचा महाउत्सव ! घरोघरी गणरायाचे आगमन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश (Ganpati Bappa) यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला आजपासून सुरुवात झाला. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नाशिकसह संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत आहे. वाजत-गाजत, गणपती बाप्पा मोरयाच्या निनादात, चैतन्यमयी वातावरणात गणरायाचे आगमन झाले.

घरातील आबालवृध्दांना आगमनाची प्रतीक्षा लागून असलेल्या गणरायाचे आज आगमन झाले. गणरायाची सजावट, पूजा व प्रतिष्ठापणेसाठी आवश्यक असलेल्या बाबींची जुळवाजुळव करण्यात प्रत्येक भाविक व्यस्त आहे. आज सकाळपासून रात्रीपर्यंत प्रतिष्ठापणेचा मुहूर्त असल्याने अनेकांनी गणरायाची प्रतिष्ठापणा केली. पुजेसाठी भाज्या, फळे, फुलांपासून, पूजेचे साहित्य, कपड्यांपर्यंत सर्वच दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.अनेकांनी आठवडाभर आधी बुकिंग करून गुरुवारी मूर्ती घरी आणली.

- Advertisement -

ही काळजी घ्याच

घराघरात गणपती बाप्पाचे आगमन अगदी जोशात, जल्लोषात, उत्साहात आणि आनंदात होणार आहे. यंदाही गणेशोत्सवावर करोनाच्या तिसर्‍या लाटेचे (Corona Third Wave) सावट आहेच. ते बघता सरकारने लावून दिलेल्या काही नियमात बाप्पाचे आगमन होत आहे. घरोघरी गणरायाचे उत्साहाने स्वागत होत असतानाच कोरोनाचे संकट वाढू नये यासाठी सगळ्यांनीच आवश्यक ती खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन पालिका आणि पोलीस या दोघांकडूनही करण्यात आले आहे. आपण देशातील जबाबदार नागरीक या नात्याने कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करत उत्सव साजरा करायला हवा.

गणेश चतुर्दशीचा शुभ मुहूर्त

  • सकाळी गणेश विसर्जनाचा मुहूर्त: सकाळी 09:10 ते दुपारी 01:56 वाजेपर्यंत

  • दुपारी गणेश विसर्जनाचा मुहूर्त: दुपारी 3.32 ते सायंकाळी 5.07 वाजेपर्यंत

  • संध्याकाळी गणेश विसर्जनाचा मुहूर्त: संध्याकाळी 8.20 ते 9.32 वाजेपर्यंत

  • रात्री गणेश विसर्जनाचा मुहूर्त: रात्री 10.56 ते पहाटे 03:10 वाजेपर्यंत

- Advertisment -

ताज्या बातम्या