बाप्पांचे आज आगमन

बाप्पांचे आज आगमन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, विघ्नहर्ता श्री गणपती Shri Ganpati बाप्पांंच्या आगमनाचा दिवस. पार्थिव गणपती पूजन करण्याची प्राचीन परंपरा Ancient Traditionआजही कायम आहे. आजपासून दहा दिवस गणरायाचे घरोघऱी भक्तीभावाने पूजन केले जाणार आहे. घराघरात गणपती बाप्पाचे आगमन अगदी जोशात, जल्लोषात, उत्साहात आणि आनंदात होणार आहे.

यंदाही गणेशोत्सवावर Ganesh Festival करोनाच्या corona तिसर्‍या लाटेचे सावट आहेच. ते बघता सरकारने लावून दिलेल्या काही नियमात बाप्पांचे आगमन होत आहे. काही मंडळांनी गणेश जयंतीला गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारीही पूर्ण झाली आहे. गणपती प्रतिष्ठापनेसाठी लागणारे पूजा साहित्य बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहे.

गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांचे डहाळे, सुपार्‍या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्री, ताम्हण, समई, अक्षता, वस्त्र, जानवे, अष्टगंध, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपार्‍या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ यांची सर्वत्र रेलचेल आहे. विशेष म्हणजे भावही आवाक्यात आहे. सर्वांचा लाडका देवता घरोघरी येत असल्याने भावीकही भावाचा विचार करताना फारसे दिसत नाही.

प्रतिष्ठापना मुहूर्त

यंदा गणेश चतुर्थी दिवशी चित्रा नक्षत्र आहे. गणेश चतुर्थी गणपती प्रतिष्ठापनेसाठी शुभ मुहूर्त भाद्रपद चतुर्थी प्रारंभ : शुक्रवार, 10 सप्टेंबर रोजी 12 वाजून 18 मिनिटे, भाद्रपद चतुर्थी समाप्ती : शुक्रवार, 10 सप्टेंबर रोजी 9 वाजून 57 मिनिटे. भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे शुक्रवार, 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. गणेश प्रतिष्ठापना शुभ मुहूर्त : सकाळी 11 वाजून 03 मिनिटांपासून ते 1 वाजून 33 मिनिटांपर्यंत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com