Ganesh Chaturthi : गणपती बाप्पा मोरया! राज्यासह देशभरात गणेशभक्तांमध्ये उत्साह

पंतप्रधान मोदींनी मराठीमधून दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
Ganesh Chaturthi : गणपती बाप्पा मोरया! राज्यासह देशभरात गणेशभक्तांमध्ये उत्साह
गणपती

मुंबई (Mumbai)

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘एक…दोन.. तीन.. चार…गणपतीचा जयजयकार’, ‘मोरया रे बाप्पा मोरया रे..’ अशा एक ना अनेक घोषणांनी वातावरण भारुन टाकत, गणेशभक्तांच्या अभूतपूर्व उत्साहात विघ्नगर्ता मानल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांचे आज घराघरात आगमन झाले. (Ganpati Aagman)

करोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यंदाही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. या काळात कठोर निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. मात्र, असं असलं तरीही गणेशभक्तांच्या मनातला उत्साह मोठा आहे. पुढचे १० दिवस हा उत्साह असाच कायम राहणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करत देशवासियांना गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. “आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!”, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com