
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा महत्वपूर्ण प्रोजेक्ट असलेल्या ‘गगनयान’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम आहे. या मोहिमेच्या अंतर्गत गगनयानची पहिली उड्डाण चाचणी २१ ऑक्टोबरला म्हणजे आज टेस्ट फ्लाईटचे प्रक्षेपण करणार आहे.
दरम्यान, गगनयान मोहिमेतील अंतराळवीर स्पेसक्राफ्टमधून अंतराळात जात असताना काही दुर्घटना घडून आग लागली तर काय होऊ शकते, अशा परिस्थितीत अंतराळवीरांना वाचवण्यासाठी काय करता येईल, याचाही विचार करण्यात आला आहे. त्यानुसार तशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
शनिवारी २१ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या गगनयान मोहिमेची पहिली मानवरहित उड्डाण चाचणी करण्यात येणार आहे. या उड्डाण चाचणीनंतर आणखी ३ चाचणी पूर्ण करण्यात येणार आहेत.
अपोलो मोहिमेच्या त्या अपयशामधून इस्रोने धडा घेतलेला आहे. तसेच त्यामधून गगनयान मोहिमेमध्ये सुरक्षेवर अधिकाधिक लक्ष दिले आहे. इस्रो क्रू एस्केप सिस्टिमबाबत विचार करत आहे. त्यामाध्यमातून आणिबाणीच्या स्थितीत अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर कसं आणता येईल, याची आखणी केली जात आहे.
इस्त्रोकडून अंतराळवीरांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी ही उड्डाण चाचणी करण्यात येणार आहे. मिशन गगनयान टीव्ही डी १ ची उड्डाण चाचणी झाल्यानंतर गगनयान कार्यक्रमांतर्गत आणखी ३ परीक्षणं यानाचे मिशनही सुरू करण्यात येणार आहे.
ही गगनयान मोहिम ३ दिवसांची असणार आहे. या मोहिमेसाठी अंतराळयानाला पृथ्वीच्या ४०० किमीच्या कक्षेत नेऊन सोडले जाणार आहे आणि पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याचे इस्त्रोचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.
श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून या यानाची उड्डाण चाचणी होण्यापूर्वी क्रू मॉड्यूलवर ISRO तर्फे विविध चाचण्या करण्यात आल्या आहेत. आता गगनयान मोहिमेची आजचे होणारे पहिले उड्डाण चाचणी यशस्वी होईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.