नाशिकरोडच्या फर्निचर उद्योजकाची अपहरण करून हत्या?

crime news
crime news

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील एका फर्निचर उद्योजकाचे (Furniture Entrepreneur) अपहरण (kidnapping) करण्यात आल्यानंतर त्यांचा मृतदेह मालेगाव (Malegaon) येथे सापडला असून प्राथमिक दृष्ट्या आर्थिक व्यवहारातून त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरीष गुलाबराव सोनवणे (Shirish Gulabrao Sonwane) (वय ५६) राहणार के जे मेहता हायस्कूलजवळ नाशिकरोड यांचा एकलहरे रोड (Eklahare Road) नाशिकरोड येथे स्वस्तिक फर्निचर कारखाना आहे.

शुक्रवार (दि.०९ रोजी) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या गाडीतून ते कोणास काही न सांगता निघून गेले. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच कारखान्यात कामाला असलेला नोकर फिरोज लतीफ शेख (Feroze Latif Shaikh) याने या संदर्भात नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे (Anil Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनला तपास यादी रवाना केल्या होत्या.

त्यांच्या शोधासाठी तीन टीम तैनात करण्यात आल्या होत्या, त्यापैकी एक टीम शिंदेगाव टोल नाका (Shindegaon Toll Plaza) येथे तर दुसरी टीम घोटी टोल नाका (Ghoti Toll Plaza) येथे रवाना केली होती. तर एक टीम स्थानिक पोलीस स्टेशन तपास करीत होती.

तसेच शिरीष सोनवणे यांचा मृतदेह मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या (Malegaon Taluka Police Station) हद्दीत असलेल्या सायतार पाडे शिवारात पाट कॅनल मध्ये शनिवारी (दि.१०) रोजी पाण्यात आढळून आला.

दरम्यान, यासंदर्भात मालेगाव पोलिसांनी नाशिकरोड पोलिसांची (Nashik Road Police) संपर्क साधून याबाबत माहिती दिली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करत आहे. तसेच शिरीष सोनवणे यांचा खून का करण्यात आला याबाबत पोलीस कसून शोध घेत असून त्यांचे अपहरण कोणी केले याचाही शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com