Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापोलीस ठाण्यांसाठी निधी देणार - उपमुख्यमंत्री

पोलीस ठाण्यांसाठी निधी देणार – उपमुख्यमंत्री

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यातील पोलीस ठाणी ( Police Stations in the State )आणि पोलीस निवासस्थानांची कामे ही प्राथमिकता असून ती कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाला दिले. या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मंत्रालयात फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस गृहनिर्माण संदर्भात महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीलागृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीच्या टप्प्यात अत्यावश्यक असलेली कामे हाती घ्या. ती वेळेवर आणि गतीने पूर्ण होतील, यासाठी प्राधान्य द्या. पोलीस ठाण्याच्या ठिकाणीच पोलीस निवासस्थानांसाठी जागा उपलब्ध असेल तर तिथेच ती बांधली जावीत. त्या जागेचा पुरेपूर उपयोग पोलीसांसाठी होईल, अशा पद्धतीने आराखडा तयार करण्याची सूचना फडणवीस यांनी केली. जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या बांधकामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधी देण्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या