नमामी गोदा प्रकल्पासाठी 'इतक्या' कोटींचा निधी

मनपाचा निर्णय; नदीत मिसळणारे 67 नाले बंद करणार
नमामी गोदा प्रकल्पासाठी 'इतक्या' कोटींचा निधी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्र सरकारच्या नमामि गंगेच्या धरतीवर दक्षिणेतील गंगा असणार्‍या गोदावरी नदी किनारी नमामि गोदा प्रकल्प ( Namami Goda Project ) राबविण्यात येणार आहे. आगामी कुंभमेळा 2027 ( Kumbhmela-2027 )ला होणार आहे, कुंभमेळ्यापूर्वी हा प्रकल्प पूर्ण होण्याची गरज असून त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. 1823 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकार देणार आहे. लवकरच मनपा सल्लागारची नेमणूक करणार आहे. दरम्यान गोदावरीत येऊन मिसळणार्‍या 67 नाल्यांचाही या प्रकल्पात महापालिकेने ( NMC )समावेश केला आहे.

नाल्यांचे पाणी पाईपलाईनद्वारे थेट मलशुध्दिकरण केंद्रात सोडले जाणार आहे. यामुळे दूषित पाण्यामुळे गोदा प्रदूषित होणार नाही व नदिचे पावित्र्य अबाधित राहील. गंगा नदीच्या धर्तीवर ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्यात केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यासाठी 1823 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी सल्लागार समिती नेमण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गोदावरीसह उपनद्या स्वच्छ व सुंदर झाल्या पाहिजे या अनुषंगाने महापालिकेकडून नंदिनी, वालदेवी, वाघाडी, कपिला या नद्यांचा समावेशदेखील प्रकल्पात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर गोदेत मिसळणारे नाले व त्यामुळे प्रदुषित होणारे पाणी ही मुख्य समस्या आहे

.

त्यावर पर्याय म्हणून या प्रकल्पाअंतर्गत नाल्याचाही समावेश करण्यात आला आहे. गोदा स्वच्छतेसाठी गोदावरी नदीत मिसळणारे तब्बल छोटेमोठे 67 नाले बंद केले जाणार आहे. नाल्यांचे पाणी पाईपलाईनद्वारे थेट मलजलशुद्दिकरण प्रकल्पात सोडले जाईल. 2027 मध्ये भरणार्‍या कुंभमेळ्या पूर्वी नमामि गोदा प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. मलवाहिकांची दुरुस्ती करणे, उपनद्यांमध्ये गॅम्बियन वॉल बांधणे, पुलावर संरक्षक बसवणे, नदीकाठचे सुशोभीकरण, घाटांचा विकास करणे आदी कामांचा समावेश आहे.

भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट

2017 च्या महापालिका निवडणुकीत तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांनी नमामि गोदा प्रकल्पासह शहर बससेवा, लॉजिस्टिक पार्क, आयटी हब असे अनेक प्रकल्प नाशिकला आणण्यासाठी प्रयत्न केले. बससेवा सुरू होऊन इतरही काही प्रकल्प सुरू झाले आहे तर नमामि गोदा प्रकल्प होण्यासाठी तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी महत्त्वाचा वाटा उचलला होता. भाजपचा हा ड्रिंम प्रोजेक्ट असून महापौर कार्यकाळाच्या अगदी शेवटच्या दिवशी भूमिपूजन झाले होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com