
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जिल्हा न्यायालयाच्या आवारातून पोलिसांच्या हातात तुरी देऊन पसार झालेल्या अरुण गवळीला (Fugitive Arun Gawli) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी बुलढाणा येथून अटक (Fugitive Arun Gawli) केली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बाल लौंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अरुण भगवान गवळी (वय-27) रा.गुम्मी ता.जि.बुलढाणा याला पोलिसांनी अटक केली होती. कोरोना काळापासून तो जामिनावर बाहेर होता. सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी दुपारी त्याला ताब्यात घेत पोलीस जिल्हा न्यायालयासमोर हजर करणार होते.
पोलीस हवालदार विजय पाटील हे त्याला हजर करण्याकामी जिल्हा न्यायालयात घेऊन आले असता सोमवारी दुपारी 4.45 च्या सुमारास अरुण गवळी याने लघुशंकेचा बहाणा केला आणि तेथून पसार झाला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.
या पथकाने केली कारवाई
पथकातील महेश महाजन, नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील आणि भरत पाटील यांनी मंगळवारी सापळा रचून संशयित अरुण भगवान गवळी याला बुलढाणा येथून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.