नवी दिल्ली

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैरान झालेल्या वाहनधारकांना बुधवारी दिलासा मिळाला. तेल कंपन्यांनी तब्बल २४ दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. त्यात कपात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १५ दिवसात दहा टक्क्यांनी घसरल्या आहेत.

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये बदल करण्यात आला. सरकारी पेट्रोलियम तेल कंपन्यांनी अनेक दिवसांनंतर सामान्यांना दिलासा दिला. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात कमी केल्या आहेत. पेट्रोलच्या किमती १८ पैसे तर डिझेलच्या किमती १७ पैशांनी कमी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने याचाच परिणाम देशातील पेट्रोल - डिझेलच्या किमतींवर झाला आहे.

यूरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्यानं इंधनाची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ७१ डॉलर प्रति बॅलरवरुन ६४ डॉलरवर आल्या आहेत.

नाशिक :

पेट्रोल ९७.७१

डिझेल ८७.३८