इंधन दराचा उच्चांक : नाशिकमध्ये पेट्रोल शंभरीपार

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली

मागील एक-दोन दिवस स्थिरावलेले पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Prices) आज पुन्हा वाढले आहेत. यामुळे नाशिकमध्ये पेट्रोलने प्रथमच शंभरी पार केली आहे. आता नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल शंभराच्या वर गेले आहे. आज पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी तर डिझेलच्या दरात २६ पैशांनी वाढ झाली. यामुळे नाशिकमध्ये १००.१५ पैसे पेट्रोलचा दर झाला. इंधन दरवाढीचा भडका उडाल्यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत लाक्षणिक वाढ झालेली पाहायला मिळाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. जर केंद्र सरकारची उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारचे व्हॅट काढून टाकले गेले तर डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रतिलिटर २७ रुपये असेल.

शहर पेट्रोल डिझेल

नाशिक १००.१५ ९०.५९

नगर ९९.४३ ८९.९०

जळगाव 100.92 91.33

धुळे ९९.४३ ९०.१

नंदुरबार 100.48 90.92

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *