सर्वसामान्यांना दिलासा; केंद्र सरकारने अबकारी करात केली कपात

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये घट
सर्वसामान्यांना दिलासा; केंद्र सरकारने अबकारी करात केली कपात

नवी दिल्ली | New Delhi

इंधन दरवाढीमुळे (Fuel Price Hike) हैराण झालेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकार (Central Government) लवकरच महत्वाचे निर्णय घेणार आहे. तसेच सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलबाबत आणि गॅसबाबत (Petrol and Diesel, Gas) मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने (Central Government) केंद्रीय अबकारी कर (Central Excise Tax) कमी केल्याने पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची (Diesel) किंमत आता स्वस्त झाले आहेत. पेट्रोल (Petrol) 9.50 रुपयांनी तर डिझेल (Diesel) 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठी दिलासा मिळाला आहे. आता केंद्रा पाठोपाठ राज्यांनींही पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवरचा कर कमी करावी अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. महागाईमुळे सामान्य जनता होरपळली जात असताना केंद्राने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अबकारी कर कमी (Central Excise Tax) केल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनामुळे झालेली बिकट अवस्था, रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) जागतिक स्तरावर वाढलेली महागाई या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचं निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी सांगितलं.

सिलेंडरला मिळणार 200 रुपयांचे अनुदान

12 सिलेंडरपर्यंत 200 रुपये प्रति सिलेंडर अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे 9 कोटी उज्ज्वला योजना धारकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे केंद्राला दरवर्षी जवळपास 6100 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com