रेशन दुकानात आता फळे, भाजीपाला

रेशन दुकानात आता फळे, भाजीपाला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

रेशन दुकानदारांच्या ( Ration Shops ) उत्पन्नात भरघोस वाढ व्हावी म्हणून आता शेतकरी उत्पादक कंपन्यांंनी उत्पादीत केलेली फळे व भाजीपाला (Fruits and vegetables produced by agricultural companies) रेशन दुकानात विकण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

सुरवातील सहा महिने प्रायोगीक तत्वावर फळे व भाजीपाला रेशन दुकानात विकला जाणार आहे. यात शासनाचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही.मात्र नाशिकची फार्म फिस्ट शेतकरी उत्पादक कंपनी व पुण्याची शाश्वत कृषी विकास इंडिया कंपनीचे उत्पादन त्यात ठेवले जाणार आहे. यापूर्वी शासनाने अशाच वस्तु विक्रीस परवानगी दिली होती. त्यातून फारसा लाभ होेत नाही असा दुकानदारांचा अनुभव आहे.

आता पुन्हा फळे व भाजीपाला त्यात ठेवला जाणार आहे.अवर सचिव गजानन देशमुख यांनी आज त्याबाबतचे आदेश पारीत केले आहेत. त्यामुळे यापुढे रेशन दुकानात गहु, तांंदूळ घ्यावयास गेल्यास दुकानदाराने फऴे व भाजीपालाही घेण्याची सक्ती केल्यास नवल वाटु घेऊ नये. शासनाने अशा जीवनावश्यक ् वस्तू त्यात ठेवण्यास परवानगी द्यावी.

मात्र त्या गहु ,तांदूळ जसा सवलतीत देतात त्या प्रमाणे रास्त भावात मिळाल्यास त्याचा आनंद निश्चीत ग्राहकांंना होईल अशा प्रतिक्रिया या आदेशानंतर ग्राहकांनी व्यक्त केल्या आहे. तर रेशन दुकानदार संघटनेने यावर टिका केली आहे. सरकार उत्पन्न वाढविण्याच्या मुळ मुद्याला बगल देऊन ज्यां वस्तूपासून फारसा फायदा होणार नाही अशा वस्तु विक्रीस परवानगी देत आहे, असे संघटनेने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com