Thursday, April 25, 2024
Homeजळगावसराईत गुन्हेगाराकडून तरुणावर गोळीबार

सराईत गुन्हेगाराकडून तरुणावर गोळीबार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

माझ्या दुश्मनला तु दवाखान्यात अ‍ॅडमिट केले असे म्हणत (young man) योगेश दिगंबर कोल्हे रा. असोदा याच्यावर जिल्हा बंदी असलेल्या सराईत (criminal) गुन्हेगार चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे रा. गणेशवाडी याने गोळीबार (Shooting) करीत प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास असोदा येथील हॉटेल आर्या समोर घडली. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चेतन आळंदे याच्यासह त्याचा साथीदार केयूर कैलास पंदाणे रा. शिवाजीनगर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जळगाव तालुक्यातील असोदा येथे योगेश दिगंबर कोल्हे हा तरुण वास्तव्यास असून त्याचा मित्र ललित उर्फ सोनू गणेश चौधरी रा. लाठी शाळेजवळ गणेशवाडी याच्यावर गेल्या तीन ते चार महिन्यांपुर्वी लखन उर्फ सोनू चौधरी यांने शिवाजीपुतळ्याजवळ वार करुन गंभीर जखमी केले होते. त्यावेळी जखमी ललित उर्फ सोनू चौधरी याला योगेश कोल्हे याने सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी चेतन उर्फ चिंग्या याच्या काही मित्रांनी त्याला उपचारासाठी दाखल करतांना पाहिले होते.

त्यामुळे गेल्या महिनाभरापासून चेतन उर्फ चिंग्या हा योगेशला नेहमी फोन करुन तु माझा दुश्मन ललित चौधरी याला दवाखान्यात अ‍ॅडमिट करतांना माझ्या मित्रांनी तुला पाहिलेले आहे. तु त्याला दवाखान्यात का दाखल केले, तुल तर मी आता जिवंत सोडणार नाही असे म्हणत त्याने शिवीगाळ केली होती. त्यानंतर देखील चेतन उर्फ चिंग्या हा नेमी फोन करीत त्रास देत होता, परंतु त्याला घाबरुन योगेश कोल्हे हा त्याचा फोन उचलत नव्हता.

गोळ्या घालण्याची दिली चिथावणी

शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास योगेश हा कल्पेश माळी व वैभव सपकाळे दोघ रा. असोदा यांच्यासोबत गावातील हॉटेल आर्या बाहेर असलेल्या सिमेंटच्या कट्ट्यावर बसलेले होते. त्यांना अचानक बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचा आवाज आला. त्यांनी रोडवर येवून बघितले असता, त्यांना समोरुन दोन इसम मोटारसायकलवर त्यांच्याजवळ आले. त्यांनी योगेशजवळ मोटारसायल थांबवून केयूर पंदाणे हा त्याच्याजवळ पळत आला. त्याने योगेशला पकडून ठेवत चिंग्या आज याला जिवंत सोडू नको याला गोळ्या घाल अशी चिथावणी दिली.

नेम चुकल्यामुळे वाचले प्राण

चेथावणी मिळताच चेतन उर्फ चिंग्या याने त्याच्याकडील बंदुक योगेशच्या दिशेने रोखून मी तुला आज जिवंत सोडणार नाही असे म्हणत त्याच्यावर गोळी झाडून त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु योगेशने प्रसंगावधान राखत केयूरचा धक्का दिल्यामुळे चिंग्याचा नेम चुकविला आणि केयूरला जोरात धक्का देवून योगेश कोल्हे हा तेथून पसार झाला. यावेळी चिंग्या व केयूर त्यांनी काही अंतरापर्यंत दोघांचा पाठलाग केला. मात्र तो मिळून न आल्याने चिंग्या व त्याचा साथीदाराने तेथून पळ काढला.

दुश्मनांसोबत राहत असल्याचा मनात होता राग

संशयितांना तालुका पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावित यांनी तालुका पोलिस ठाणे गाठून दोघांची कसून चौकशी केली. यामध्ये योगेश हा आपल्या दुश्मनांसोबत राहत असल्याचा राग चिंग्याच्या मनात असल्याचे कारण तपासात समोर आले आहे. तसेच गुन्हेगार चिंग्याला न्यायालयाने जळगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये येण्यास बंदी घातली आहे. मात्र तरी देखील तो जळगावात पोलिसांना मिळून आला आहे.

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जीवेठार मारण्यासाठी गोळीबार झाल्यामुळे योेगेश कोल्हे हा प्रचंड घाबरुन गेला होता. त्यानी घडलेली घटना आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्याने तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे रा. गणेशवाडी पांडे चौक व केयूर कैलास पंदोणे रा. शिवाजीनगर या दोघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकटुकी शेतातून घेतले ताब्यात

गोळीबार केल्यानंतर चेतन उर्फ चिंग्या आळंदे आणि केयूर कैलास पंधारे हे दोघे धरणगावच्या दिशेने पळाले होते. त्यानंतर वाकटूकी शिवारातील एका शेतामध्ये दोघे लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने दोघ संशयितांच्या वाकटूकी शिवारातून मुसक्या आवळल्या. त्यानंतर दोघांना तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या पथकाची कामगिरी

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील, पोलिस उपनिरीक्षक गणेश चौभे, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, विजय पाटील, नितीन बाविस्कर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या