Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशआजपासून नवे नियम लागू ; जाणून घ्या तुमच्या दैनंदिन व्यवहारात काय बदल...

आजपासून नवे नियम लागू ; जाणून घ्या तुमच्या दैनंदिन व्यवहारात काय बदल होणार

नवी दिल्ली | New Delhi

देशात महागाईमुळे सामान्य जनता आधीच होरपळून निघत असताना आजपासून काही नियमांमध्ये (Changes In Rules) बदल झाल्याने त्यात आणखीनच भर पडणार आहे, त्यामुळे सामान्यांच्या खिशावर अधिकचा भर पडणार आहे. केंद्र सरकारने १ जुलै पासून काही नियमांमध्ये बदल केले आहे. यामुळे तुमच्या दैनंदिन व्यवहारात कुठे परिणाम होणार आहे जाणून घ्या.

- Advertisement -

वाहतूक नियम

वाहतूकीचे नियम सगळेच पाळतात, मात्र विशेष करुन चारचाकी गाडीमध्ये मागील सीटवर बसलेल्या व्यक्तींनाही सीट बेल्ट वापरणे महत्वाचे आहे. मात्र हा नियम सहसा कोणीही पाळताना दिसत नाही. त्यामुळे जर हा नियम पाळला तर तुमच्या खिशावर नक्कीच भार येणार नाही, मात्र जर हा नियम पाळला नाही तर तुम्हाला नक्कीच मोठा दंड होऊ शकतो.

पॅन-आधार कार्ड लिंक

ज्या लोकांनी आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही, त्यांचे पॅन कार्ड आजपासून १ जुलै पासून निष्क्रिय केले जाणार आहे. या परिस्थितीत तुम्ही आयटीआर दाखल करु शकणार नाही किंवा तुमची प्रलंबित रिटर्न प्रक्रिया पुढे जाईल. त्याच वेळी, तुमचे प्रलंबित परतावे देखील जारी केले जाणार नाहीत आणि तुमची कर कपात देखील उच्च दराने होईल.

Buldhana Accident : “बस डिव्हायडरला धडकली अन् पेट घेतला, आम्ही काचा फोडून…”; बचावलेल्या प्रवाशांनी सांगितली आपबिती

एलपीजीच्या किमती

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजीच्या किमती बदलतात. गेल्या महिन्यातही एलपीजी गॅस सिलिंडर विकणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजीचे दर बदलले होते. आता पुन्हा एकदा त्याच्या किमती बदलल्या जाऊ शकतात.

समृद्धी महामार्गावर अग्नितांडव; बसच्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

इलेक्ट्रॉनिक वस्तु स्वस्त होणार

आजपासून पासून मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप यांसारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत कपात केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि त्यांच्या घटकांचे दर खूप कमी झाले आहेत. सेमीकंडक्टर आणि कॅमेरा मॉडेल्ससह स्मार्टफोनच्या सर्व घटकांच्या किमतीत घट झाल्यामुळे मोबाईल, टीव्ही, फ्रीजच्या किमतीत घट होणार आहे.

HDFC चे विलीनीकरण

आजपासून, देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या HDFC बँकेत गृहनिर्माण विकास वित्त निगम म्हणजेच HDFC Ltd चे विलीनीकरण होणार आहे. या विलीनीकरणानंतर एचडीएफसी लिमिटेडच्या सेवा बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध होतील. आता एचडीएफसी बँकेच्या शाखेत कर्ज, बँकिंगसह इतर सर्व सेवा पुरवल्या जातील.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या