Saturday, April 27, 2024
Homeजळगावचोपडयात शुक्रवारची रात्र ठरली जैन कुटुंबासाठी काळरात्र

चोपडयात शुक्रवारची रात्र ठरली जैन कुटुंबासाठी काळरात्र

चोपडा chopada ( प्रतिनिधी )
      शहरातील मेनरोडवरील राहुल एम्पोरियम या कपड्याच्या दुकानासह (cloth shop) दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यास शुक्रवारी मध्यरात्री १ :३० वाजेच्या सुमारास शॉक सर्कीटमुळे भीषण आग (terrible fire) लागली. त्यात गौरव सुरेश जैन (३०)या विवाहित तरुणाचा भाजल्याने जागीच मृत्यू (youth died) झाला तर आगीने उग्ररूप धारण केल्याने दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी,पोलीस आणि नागरिकांना यश आले.

कुटूंबातील सात जणांपैकी सहा जणांचा जीव वाचला मात्र एका विवाहित तरुणाचा भाजल्याने करुन अंत झाला. तो पर्यंत दुकानातील कपड्यांसह घरातील संसार उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली.या हृदयद्रावक घटनेने शहरात सर्वत्र शोककळा पसरली असून,हळहळ व्यक्त होत आहे.दुकानाला लागलेल्या आगीची तीव्रता एव्हढी भीषण होती की,चोपडा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलासह यावल,धरणगाव,पारोळा, शिरपूर,अमळनेर व जळगांव येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण केल्यानंतर तब्बल साडेचार तासांनी भीषण आग आटोक्यात आली. यावेळी घटनास्थळावर शहरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
 
   शहरातील रहिवाशी व व्यापारी सुरेश हणतमल जैन यांचे मेनरोडवर तीन मजली इमारतीत राहुल एम्पोरियम नावाचे कपडा विक्रीचे दुकान असून ते पत्नी,तीन मुले,सून व नात अशा सात जणांच्या कुटुंबासह दुसऱ्या मजल्यावर वास्तव्यास आहेत. नेहमी प्रमाणे दि.१० फेब्रुवारी रोजी शुक्रवारी रात्री ९ वाजता दुकान बंद करून वरच्या मजल्यावरील घरी गेले.त्यानंतर व्यापारी सुरेश हणतमल जैन यांचेसह सर्वकुटुंब गाढ झोपेत असतांना शुक्रवारी मध्यरात्री नंतर १:३० वाजेच्या सुमारास राहुल एम्पोरियम दुकानाला शॉक सर्कीटमुळे तिसऱ्या मजल्याला आग लागली.यावेळी घरात विक्रीसाठी आणलेले कपडे,साड्यांच्या गाठयांसह संसार उपयोगी वस्तू असल्यामुळे बोलता बोलता आगीने उग्ररूप धारण केल्याने भीषण आग तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाऊन पोहचली.आगीच्या लाटांचा आगडोंब व धूर बघून
गल्लीतील शेजाऱ्यांनी गाढ झोपेत असलेल्या जैन कुटुंबाला आरोळ्या देऊन तर काहींनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून सुरेश जैन व त्यांच्या मुलांना दुकानासह घराला भीषण आग लागल्या ची माहिती दिली.

- Advertisement -

तर शेजारी वास्तव्यास असलेले व्यापारी नेमीचंद जैन यांनी प्रथम नगरपालिकेला आगीची माहिती देऊन पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथींसह बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना माहिती देऊन मदतीसाठी बोलाविले.त्या नंतर चोपडा नगरपरिषदेचा अग्निशामक दलासह बंब
घटनास्थळी येऊन पोहचला.

मात्र बंबाच्या गाडीचा पाईप छोटा व लिक असल्याने दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर पाणी पोहचत नव्हते त्यामुळे आग आटोक्यात येत नसल्याने जैन कुटुंब दुसऱ्या मजल्यावर अडकलेच होते.माहिती मिळताच चंद्रहास गुजराथी तात्काळ घटनास्थळावर दाखल होऊन पोलिसांना माहिती देऊन शिरपूर येथील अग्निशामक दलाचा बंबला बोलाविले.पोलिसांनी
भीषण आगीची माहिती जळगाव कंट्रोल रूमला वायरलेस यंत्रणेने कळविली.

यावेळी अग्निशामक दलाचे कर्मचारी आत्माराम बाविस्कर,दीपक बडगुजर,व्यापारी प्रवीण राखेचा,नाना देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील,सौरभ नेवे, सचिन सोनवणे,चेतन कानडे,अमर बोहरा,शिवा पाटील आदींनी शर्थीचे प्रयत्न करून राहुल एम्पोरीयम दुकानाच्या वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याच्या दरवाज्याला लावलेले कुलूप तोडून स्वतःचा जीव धोक्यात घालून पायऱ्यांवर पाईपद्वारे पाणी टाकून वरच्या मजल्यावर प्रवेश करून तिन्ही रूमचे दरवाजे तोडून व्यापारी सुरेश हणतमल जैन,पत्नी सौ.कविता जैन,मोठा मुलगा
सून सौ.मोनिका जैन,चार वर्षानी नात कु.आर्या, मुलगा शुभम जैन या सर्वांचा आगी पासून बचाव करून तात्काळ बाहेर काढले.

तर संकेत जैन यास वरच्या मजल्यावरील गॅलरीत आणून नगरपरिषदे च्या इलेक्ट्रिक विभागाच्या हायड्रोलीक व्हॅनच्या ट्रॉलीत बसवून खाली उतरविले.यावेळी गौरव जैन हा पत्नी मोनिकाचा हातसोडून दुसऱ्या मजल्या वरून आलो सारे सांगून गेला यावेळी भीषण आगीच्या ज्वालांमुळे छताच्या पीओपीचे तुकडे पडल्यामुळे गौरव जैनला बाहेर निघणे मुश्किल झाले त्यामुळे तो घाबरून शेजारी संडासमध्ये ओल्या चादरी अंगावर घेऊन बसला मात्र आगी च्या प्रचंड लाटांच्या धुरामुळे ऑक्सिजन अभावी त्याचा जागीच गुदमरून दुर्दैवी करुन अंत झाला तसेच भीषण आगीमुळे गौरव जैनचा मृतदेह  ९० टक्के जळाला होता.

    त्यानंतर शिरपूर,अमळनेर,पारोळा,धरणगाव यावल,जळगाव नगरपालिकेचे अग्निशामक बंब रात्रीच घटनास्थळी येऊन दाखल झाले. त्यामुळे आगीचा आगडोंब विझवण्यासाठी मोठी मदत झाली.तसेच पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांनी देखील तात्काळ बँकेतील व स्वतः च्या पेट्रोप पंपावरील असे वीस बंब आणून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी नगरपरिषदेची इलेक्ट्रिक विभागाची हायड्रोलीक व्हॅन आल्याने बचाव कार्याला गती मिळाली.जळगाव जिल्ह्यातील सात नगरपरिषदे च्या अग्निशामक बंबच्या अद्यावत गाड्या व कर्मचाऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर साडेचार तासांनी आग आटोक्यात आली.

यावेळी माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि. अजित साळवे,पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोहेकॉ.जितेंद्र सोनवणे,पोना.मधुकर पवार, पोना.हेमंत कोळी,पो.ना.अहिरे मेजर,पोना.शुभम पाटील यांचेसह पोलीस कर्मचारी रात्रीच घटना स्थळी दाखल होऊन बचाव कार्यास मदत केली.

तसेच दिवसभर देखील पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळावर तैनात होते.भीषण आगीत गौरव जैन या तीस वर्षीय तरुणा चा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आज शनिवारी दिवसभर बाजारपेठेतील सर्वच व्यवहार बंद ठेवले होते.तर आज दिवसभर घटनास्थळावर नागरिकांची गर्दी दिसून आली तसेच प्रत्येक अबाल वृद्ध व महिलांनी घटनेची आस्थेवाईकपणे चौकशी करून गौरवच्या मृत्यू बद्दल हळहळ व्यक्त करीत होते.

या हृदयद्रावक घटनेने शहरात शोककळा पसरली होती. दरम्यान आज शनिवारी सकाळी ११ वाजता गौरव जैन यांचेवर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.गौरव जैन याच्या पश्चात पत्नी मोनिका जैन(२५), मुलगी कु.आर्या जैन(४),वडील-सुरेश जैन,(५५),आई-कविता जैन (५०), भाऊ-शुभम जैन (२५) व संकेत जैन(२२) असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या