Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रमोफत शिवभोजन थाळी बंद, आता द्यावे लागणार इतके पैसे

मोफत शिवभोजन थाळी बंद, आता द्यावे लागणार इतके पैसे

राज्यात सुरू असलेल्या ब्रेक द चेन (break the chain) या अभियानांतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते. कोरोना काळात गरजुंना मोफत शिवभोजन थाळी देण्यात येत होती. त्यामुळे गरीब आणि गरजूंना मोठा आधार मिळाला होता. 30 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकाराने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला होता.

धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

- Advertisement -

ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन संख्येतही दीडपट वाढ करण्यात आली. 1 ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळी मोफत मिळणार नाही. तसेच शिवभोजन केंद्रातून दिली जाणारी पार्सल सेवा देखील बंद होणार आहे. आता 1 ऑक्टोबर 2021 पासून शिवभोजन थाळी 10 रुपयाला उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या