ठरलं ! राज्यात सर्वांना मोफत लस, सहा महिन्यात सर्वांचे लसीकरण

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
ठरलं ! राज्यात सर्वांना मोफत लस, सहा महिन्यात सर्वांचे लसीकरण

मुंबई | Mumbai

देशभरात कोरोना लसीकरणाचा मोठा व तिसरा टप्पा १ मे पासून सुरु होत आहे. या टप्यात १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. येत्या सहा महिन्यांत सर्वांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Title Name
Corona vaccine : 18 + साठी आज दुपारी ४ वाजेपासून नोंदणी; जाणून घ्या कसे करावे रजिस्ट्रेशन
ठरलं ! राज्यात सर्वांना मोफत लस, सहा महिन्यात सर्वांचे लसीकरण

दरम्यान ठाकरे सरकारने लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात सर्व नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील जनतेला लसीकरण करण्यासाठी जवळपास १२ कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी राज्य सरकार ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या फक्त ४५ वर्ष वयोगटातील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीकरण केले जात आहे.

राज्यात दररोज ६५ हजारापेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन मोहीमेअंतर्गत राज्य सरकारने राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. केंद्र सरकारनेही ४५ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण सुरू केले आहे.

करोनाचं थैमान रोखन्यासाठी लसीकरण शक्य तितक्या लवकर होणे गरजेचे आहे. त्यामुळे १ मेपासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनाही लसीकरण खुले करण्यात आले आहे. केंद्राने ही जबाबदारी राज्य सरकारांकडे सोपवली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com