Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकर्‍यांची फसवणूक; तिघांंना पोलीस कोठडी

शेतकर्‍यांची फसवणूक; तिघांंना पोलीस कोठडी

पिंपळगाव ब. । प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

सुकेणा, उगाव परिसरासह निफाड तालुक्यातील असंख्य शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या तिघांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेल्या बळीराजा सन्मान मोहिमेंतर्गत ही कारवाई झाल्याने फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांना चाप बसणार आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, संशयित आरोपी मनोज साहु (रा. चंद्रभागा नगर, चिंचखेड रोड, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक, मुळ रा. कोल्हार, कर्नाटक) याने बीके फ्रुट कंपनीमार्फत संशयित आरोपी लक्ष्मण काशीनाथ शिंदे, रा. वनसगाव, ता. निफाड) व जितू पाटील (रा. पिंपळगाव बसवंत) यांच्यासोबत फिर्यादीच्या द्राक्षबागेत जाऊन द्राक्षमालाचा 4500 रुपये क्विंटल दराने व्यवहार केला. मनोज शाहू याने द्राक्ष मालाचे पहिल्या दिवशी 83 हजार रोख देऊन खरेदीचा विश्वास संपादन करून 202 क्विंटल 80 किलो द्राक्षमाल तोडून नेला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

द्राक्षमालाच्या उर्वरित आठ लाख 29 हजार 600 रुपये रकमेचा आयसीआयसी बँकेच्या पिंपळगाव बसवंत शाखेचा धनादेश अदा केला. त्यानंतर फिर्यादीने धनादेश वटवण्यासाठी वेळोवेळी पत्नीच्या खात्यात टाकला असता तो वटला नाही. इतर संशयितांना वारंवार विचारणा करुनही उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने याप्रकरणी शेतकर्‍यांनी ओझर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित आरोपींना पिंपळगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, न्यायालयाने संशयित आरोपींना पोलीस कोठडी सुनावल्यानंतर शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर संशयितांना पिंपळगाव बाजार समितीत नेऊन शेतकर्‍यांना ओळख करून दिली. भविष्यात अशा व्यापार्‍यांशी कुठलाही व्यवहार करू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी केले.

अनिल कदम यांचा पुढाकार

द्राक्ष उत्पादकांचे पैसे बुडविणार्‍या व्यापारी व पायलटबाबत माजी आमदार अनिल कदम यांच्याकडे शेतकर्‍यांनी तक्रार केली. त्यानंतर कदम यांनी तत्काळ पाऊले उचलत पोलिसांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले. यामुळे शेतकर्‍यांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे.

– रावसाहेब कदम, शेतकरी ओझर

बळीराजाला न्याय देण्याचा प्रयत्न

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेल्या बळीराजा सन्मान हेल्पलाईनच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे व्यापार्यांकडे अडकलेले पैसे मिळवून दिले जात आहे. ज्या शेतकर्‍यांचे पैसे बाकी असतील त्यांनी तक्रारी देण्यासाठी पुढे यावे.

– दुर्गेश तिवारी, पोलीस निरीक्षक, ओझर

पोलीस प्रशासनाचे सहकार्य

द्राक्ष व्यापारी पायलटच्या माध्यमातून शेतकर्‍यांची फसवणूक करीत आहे. एक – दीड वर्षापासून द्राक्ष व्यापार्‍यांकडे अडकलेले पैसे मिळत नसल्याने आम्ही ओझर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपींवर गुन्हे दाखल करून शेतकर्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभल्यामुळे अनेक शेतकर्‍यांना न्याय मिळू शकेल.

– रवी बोरगुडे, शेतकरी, नैताळे

पायलटवर कारवाई व्हावी

शेतकर्‍यांचे पैसे बुडविणार्‍या व्यापारी व पायलट यांनी लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडे कोटी रुपयांची संपत्ती असून, शेतकर्‍यांना मात्र पैसे देण्यास टाळाटाळ केली जाते. अशा व्यापारी व पायलटवर कडक कारवाई करून शेतकर्‍यांना काय मिळवून द्यावा.

– महेश शेजवळ, शेतकरी, ओझर

- Advertisment -

ताज्या बातम्या