Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकच्या बड्या वितरकाकडून चार कोटींची फसवणूक?

नाशिकच्या बड्या वितरकाकडून चार कोटींची फसवणूक?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रिअलमी कंपनीच्या अधिकृत डिस्ट्रीब्यूटरने चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा तक्रार अर्ज भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रारदारांनी दिला…

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रारदार पारस गौतमचंद छाजेड (रा. औरंगाबाद), आदित्य राधेशाम मालीवाल (रा. औरंगाबाद), यासिर अब्दुल रशीद बागवान (रा. कोल्हापूर), प्रमोद शामसुंदर सोनी (रा. इचलकरंजी), सुयोग कलानी (रा.सोलापूर), सुहास गजानन उनउणे (रा. कराड), मोहसीन जावेद कादरी (रा. बीड), आनंद सुभाष लोढा (रा. कोपरगाव) यांनी तक्रार अर्ज दिला आहे.

या अर्जात रिअलमी कंपनीचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर इगल इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिकचे मालक अनिल वासुदेव खेमानी, नीलम अनिल खेमानी, सीता वासुदेव खेमानी, वासुदेव राधाकिसन खेमानी यांच्यासोबत तक्रारदारांचे तीन वर्षांपासून व्यावसायिक संबंध होते.

मात्र जुलै महिन्यात तक्रारदार यांना ऍडव्हान्स रकमेच्या बदल्यात कुठलाही माल देण्यात आला नसल्याने सर्वांची मिळून सुमारे ४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केला नसून हा व्यवहार नाशिकच्या बाहेर झाला असल्याने यासंदर्भात तपास करूनच गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सुयोग कलानी यांनी त्यांच्या ट्विटरवर तक्रार अर्जाच्या फोटोचे ट्विट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या