राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विनोद देशमुखांसह 11 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

बनावट दस्तऐवजांवरुन कोट्यावधीची मालमत्ता हडप
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विनोद देशमुखांसह 11 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

बनावट दस्ताऐवजांच्या (forged documents) आधावरुन सौदा पावती करीत कोट्यावधी (worth crores of rupees)रुपयांची मालमत्ता (Property) हडपल्याचा (usurpation) प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP office bearers) पदाधिकारी विनोद पंजाबराव देशमुख, अ‍ॅड.सुरेखा पाटील, अ‍ॅड.सतिष चव्हाण यांच्यासह 11 जणांविरुद्ध (Against 11 people)जिल्हापेठ पोलिसात (police) फसवणुकीचा (Fraud case registered) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विनोद देशमुखांसह 11 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
Breaking # जून्या वादातून रामेश्वर कॉलनीत तरुणांवर चॉपर हल्ला

शहरातील जिल्हा परिषद कॉलनीतील मनोज लिलाधर वाणी (वय-41) हे वास्तव्यास असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहरातील मौजे पिंप्राळा शिवारातील घर जागा व मजल्यावरील बांधीव घरजागा व तळमजल्यावरील सामाईक अविभाज्य व गच्ची मालकीहक्कासह मिळकत नोंदणीकृत खरेदी खतान्वये प्रत्येकी 30 लाख प्रत्येकी किंमत राजेश पाटील यांना अदा केले होते. तसेच त्यांच्याकडून दि. 3 ऑक्टोंबर 2019 रोजी त्याची खरेदी केली होती. त्या खरेदी खतानुसार मिळकत वाणी दाम्पत्याच्या ताब्यात आहे. त्याचप्रमाणे कै. घनशाम लक्ष्मण पाटील यांच्याकडुन भाडेतत्वाचा करारनामानुसार दि. 18 मार्च 2016 रोजी मेहरूण शिवारातील प्लॉट नं. 18 / 2 रामदास कॉलनी, येथे ऑफीससाठी जागा व्यावसायिक वापर करण्यासाठी 10 वर्षाकरीता दरमहा 10 हजार रुपये अशी भाडयाने घेतलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विनोद देशमुखांसह 11 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
Breaking #आव्हाण्यात वाळूमाफियांचा राडा

कटकारस्थान करीत मिळविली मालमत्ता

मनोज वाणी याच्या मालकीचे रहाते घर आणि रामदास कॉलनी भाडेतत्वावर घेतलेल्या इमारतीमधील तळमजलेवरील मिळकती बनावट सौदेपावत्या या राजेश घनशाम पाटील यांनी त्यांचे सहकारी जितेंद्र बाबुराव देशमुख (रा. अयोध्या नगर,), मिलींद नारायण सोनवणे (रा. 7 नुतनवर्षा कॉलनी), जगदीशचंद्र पुंडलिक पाटील (रा. खोटेनगर स्टॉपजवळ), सुजाता राजेश पाटील (रा.शिवरामनगर), विनिता संजय पाटील (उदयपुरा बंगलौर), लिना रणजित बंड (रा. अमरावती), अनिता नितीन चिंचोले (रा.आर्दशनगर, जळगाव), अ‍ॅड.सतिश बी. चव्हाण (रा.रामबाग कॉलनी जळगाव), अ‍ॅड.सुरेखा डी. पाटील (रा. जळगाव) अशांनी आपआपसांत संगनमत करून कटकारस्थान करत मयत घनशाम लक्ष्मण पाटील व हिराबाई लक्ष्मण पाटील यांच्या सोबत त्यांचा दि. 3 जानेवारी 2017 रोजी लेखी सौदा पावती करारनामा झाला असल्याचे त्यांना दि. वृत्तत्रात दि. 2 नोव्हेंबर 2022 रोजी छापून आलेल्या जाहीर नोटीसद्वारे समजले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विनोद देशमुखांसह 11 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
ब्लॉग : मी पाहिलेली कविता
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विनोद देशमुखांसह 11 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
VISUAL STORY : आणि अभिनेत्री सायली संजीवने उघड केलं गुपित

खोट्या स्वाक्षरी करीत केली फसवणुक

सौदापावतीनुसार 45 लाख रुपये रोख वेळोवेळी रोख अदा केले असल्याचे सौदा पावतीत नमुद असतांना सर्व संशयित आरोपींनी संगनमत करून कटकारस्थान करत रितसर नोंदणीकृत खरेदीखतान्वये विकत घेतलेली मिळकत हडप करता यावी, यासाठी मागील तारखेचा स्टॅम्प विकत घेतला. त्यावर मयत झालेले घनशाम लक्ष्मण पाटील यांच्या खोट्या सहया करून खोटी रक्कम दिल्याचे नमुद करत दोन्ही सौदा पावत्या बनावट तयार करुन फसवणुक केल्याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com