Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याAccident News : पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात; ४ महिलांचा मृत्यू, सहा...

Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात; ४ महिलांचा मृत्यू, सहा जखमी

सोलापूर | Solapur

येथील सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur-Pune Highway) असलेल्या मोहोळजवळील यावली गावानजीक माल ट्रक व कारचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तुळजापूरकडे देवदर्शनासाठी जाणाऱ्या कारमधील चार जणांचा मृत्यू (Death) झाला असून सहा जण जखमी झाले आहेत…

- Advertisement -

Maharashtra Rain : राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? वाचा सविस्तर

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील अपघातग्रस्त महिला भाविक (Women Devotees) रांजणगाव (ता. पारनेर जिल्हा अहमदनगर) येथून तुळजापूर (Tuljapur) येथे दर्शनासाठी निघाल्या होत्या. यावेळी कार मोहोळ तालुक्यातील यावलीजवळ आली असता पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की कारमधील तीन महिलांचा जागीच तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Pradeep Sharma : अँटिलिया स्फोटक प्रकरणी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात (Solapur District Hospital) दाखल केले. तर मृतांची ओळख पटली नसून पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे. तसेच अपघातामधील मृत हे अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निकटवर्तीय नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

IND vs IRE : भारत-आयर्लंड यांच्यात आज तिसरा टी २० सामना

अपघातातील मृतांची नावे

आदमअली मुनावरअली शेख (वय ३७ ), हिराबाई रामदास पवार (वय ७५), कमलाबाई मारूती वेताळ (वय ६०, रा. रांजनगाव मशीद ता. पारनेर) आणि द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४०, रा. राजंनगाव मशीद) अशी मृतांची नावे आहेत.

अपघातात जखमी झालेल्यांची नावे

बळी बाबू पवार (वय २७), छकुली भीमा पवार (वय २७), साई योगीराज पवार (वय ७ वर्ष), मंदाबाई नाथा पवार (वय ५२), सुरेखा भारत मोरे (वय ४५), बायजाबाई रामदास पवार (वय ६०, सर्व रा. राजंनगाव,जि अहमदनगर ) अशी जखमींची नावे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या