Nashik : सहलीच्या बसला अपघात; ४ विद्यार्थी गंभीर

Nashik : सहलीच्या बसला अपघात; ४ विद्यार्थी गंभीर

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

तालुक्यातील म्हैसवळण घाटात (Ghat) आज दुपारी विश्राम गडावरून टाकेद (Taked) नाशिकच्या (Nashik) दिशेने निघालेल्या सहलीच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात (Accident) घडला...

याबाबत अधिक माहिती अशी की, बस क्रमांक एमएच १५ ए.के. १६३२ मध्ये इस्कॉन मंदिर संस्थेच्या वतीने जवळपास चाळीस विद्यार्थी टाकेद तीर्थावर आले होते. त्यानंतर ते विश्रामगड (पट्टाकिल्ला) येथे भेट देऊन आले. मात्र, येतांना परतीच्या प्रवासात नाशिक-नगर जिल्हा सरहद्दीवर वाघोबाजवळ बसचे ब्रेक फेल झाले. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत डोंगराच्या कडेला बस मारल्याने बस पलटी झाली. त्यावेळी या अपघातात दहा विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील ४ जण गंभीर आहेत.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक युवकांनी जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी एसएमबीटी रुग्णालयात (SMBT Hospital) दाखल केले. तसेच घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल धुमसे यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे, बी. पी. राऊत, सुहास गोसावी, आर. पी. लहामटे, केशव बस्ते यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी (Police personnel) घटनास्थळी मदत कार्य केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com