धक्कदायक! गैरसमजातून साधूंना बेदम मारहाण

jalgaon-digital
1 Min Read

सांगली | Sangli

मुले पळवणारी चोरांची टोळी समजून गैरसमजुतीतून चौघा साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना जत तालुक्यातील लवंगा येथे घडली. यानंतर उमदी पोलिसांनी कारवाई करत साधूंना नागरिकांच्या तावडीतून सोडवले…

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथून चार साधू कर्नाटक येथे देवदर्शनासाठी गेले होते. कर्नाटक येथील देवदर्शन आटपून ते लवंगा मार्गे विजापूर येथे जात होते.

दरम्यान रस्त्यात गाडी थांबवून विजापूर हा रस्ता कोणता आहे याबाबतची विचारणा एका विद्यार्थ्यास केली असता पोरे चोरणारी टोळी समजून चारही साधूंना गाडीतून ओढून काठीने, पट्ट्याने मारहाण करण्यात आली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तालुक्यात सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

यावेळी साधूंनी आपले ओळखपत्र, आधार कार्ड याबाबतची सविस्तर माहिती जमावाला देऊन ही जमावाने न ऐकल्याने हा प्रकार घडला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *