जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार; चौघांचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली | New Delhi

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) राजौरीच्या डांगरी गावात गोळीबाराची (firing) घटना घडली असून या घटनेत ४ जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर ५ हून अधिक लोक जखमी झाले असून या घटनेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे....

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी रविवार (दि.०१) रोजी जम्मू-काश्मीरच्या राजौरीच्या डांगरी गावातील नागरिकांवर ५० मीटर परिसरात तीन वेगळ्या-वेगळ्या घरांवर गोळीबार केला. या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू तर ५ हून अधिक जण जखमी झाले. त्यानंतर जखमींना राजौरी (Rajouri) येथील मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर परिसरात नाकाबंदी (Blockade) करण्यात आली आहे.

दरम्यान, त्यानंतर जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह (Mukesh Singh) यांनी सांगितले की, 'दोन दहशतवाद्यांनी अप्पर डांगरी भागातील काही घरांना लक्ष्य केले. तसेच पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांनी अप्पर डांगरी परिसराला घेरले असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com