Video : टोल नाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; रुग्णासह चौघांचा मृत्यू

नवी दिल्ली । New Delhi

सध्या पावसाळ्याचे (Rainy season) दिवस असून या दिवसांमध्ये बरेच अपघात होत असतात. अशाच एका भयंकर अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कर्नाटकमधील (Karnataka) उडप्पी जिल्ह्यामधील (Udappi district) बिंदूर टोलनाक्याजवळ (Bindur toll plaza) एका रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला असून हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे...

मिळालेल्या माहितीनुसार हुन्नावर ते कुंदापूर (Hunnawar to Kundapur)असा प्रवास करत असणाऱ्या या रुग्णवाहिकेमध्ये (Ambulance) एक रुग्ण आणि दोन कर्मचारी होते. या तिघांचाही अपघातामध्ये मृत्यू (Death) झाला आहे. तसेच टोल नाक्यावरील एका कर्मचाऱ्याचाही या अपघातात मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पावसामुळे ओल्या झालेल्या रस्त्यावरुन गाडी सरकल्याचे दिसत आहे.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक रुग्णवाहिका भरधाव वेगात टोलनाक्याच्या दिशेने येतांना दिसत आहे. यावेळी टोलनाक्यावरील कर्मचारी (Employees) रुग्णवाहिकेला रस्ता करून देण्यासाठी बॅरेकेट्स बाजुला करत आहे. तितक्यात एका नाजूक वळणावरुन टोल नाक्याच्या दिशेने येणाऱ्या रुग्णवाहिकेसमोर एक गाय रस्त्यात बसलेली दिसत आहे. एक कर्मचारी या गायीला मार्गामधून उठवतो. मात्र ही गाय लेनवरच असल्याने तिला वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेचा चालक जोरात ब्रेक दाबतो. वेगात असणाऱ्या रुग्णवाहिकेला अचानक ब्रेक लावल्याने गाडीवरील नियंत्रण सुटते आणि ती थेट टोल नाक्यावरील बूथला जाऊन धडकते. या अपघातामध्ये रुग्णवाहिकेतील रुग्णही गाडीबाहेर फेकला गेल्याचे दिसत आहे. तर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यालाही रुग्णवाहिकेची धडक बसल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

दरम्यान, रुग्णवाहिकेचा वेग प्रचंड असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. तसेच चालकाने टोलनाक्यावरील लोकांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले पण जमिनीवर साचलेल्या पाण्यामुळे टायर घसरून रुग्णवाहिका उलटली. त्यामुळे रुग्णवाहिकेतील लोक बाहेर फेकली गेली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com