Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याAccident News : पुणे-बंगळूरु महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रकच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू

Accident News : पुणे-बंगळूरु महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रकच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू

नवी दिल्ली | New Delhi

पुणे-बंगळूर महामार्गावरील (Pune Bangalore Highway) चित्रदुर्गजवळ भरधाव कारने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात (Car-Truck Accident) चार जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत….

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शमशुद्दीन मक्तुमसाब शेख (वय ५७), तबरेज शमशुद्दीन शेख (१२, दोघेही रा. धामणे रोड, विष्णू गल्ली, वडगाव), खलील शरिफ (४६), मलिका खलिल शरिफ (४५, दोघेही रा. तुमकूर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर रिहान शरिफ (वय १२), रेहमान (वय १०) आणि महजबीन (वय ७, तिघेही रा. तुमकूर) अशी जखमींची नावे आहेत.

Maratha Andolan : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंना भेटणार, तोडगा निघणार का?

हे सर्वजण तुमकुरला परत जाण्यासाठी कारने (Car) रात्री १ च्या सुमारास बेळगावहून (Belgaum) रवाना झाले होते. यावेळी कारमध्ये एकूण सात जण होते. तर खलिल हे कार चालवत होते. यावेळी त्यांची कार सकाळी ७.३० च्या सुमारास मल्लापूर- गोल्लरट्टी (चित्रदुर्गजवळ) आले असताना त्यांच्या कारची महामार्गाच्या (Highway) कडेला थांबलेल्या ट्रकला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. यात चौघे जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Aditya-L1 ची यशस्वी घोडदौड सुरू; यशस्वीरित्या बदलली दुसरी कक्षा

दरम्यान, या अपघाताची (Accident) माहिती मिळताच घटनास्थळी चित्रदुर्गचे जिल्हा पोलिसप्रमुख धर्मेंद्र कुमार मीना यांनी भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी धाव घेवून मोटारीत अडकून पडलेल्या तिन्ही मुलांना तातडीने उपचासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक (Arrested) करण्यात आली असून पोलिस उपनिरीक्षक एस. के. मंजुनाथ अधिक तपास करीत आहेत. तसेच महामार्गावर ट्रक उभा असल्याचे लक्षात न आल्याने व कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार आदळली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

I.N.D.I.A. विरोधात मोदी सरकारचा मास्टर प्लॅन; विशेष अधिवेशनात टाकणार ‘हा’ डाव

- Advertisment -

ताज्या बातम्या