विजेचा शॉक लागून बाप-लेकासह चौघांचा मृत्यू

विजेचा शॉक लागून बाप-लेकासह चौघांचा मृत्यू

पुणे | Pune

येथील भोर तालुक्यातील (Bhor Taluka) निगडे गावात (Nigde village) विजेचा शॉक (Electric Shock) लागून बाप लेकासह चार जणांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल सुदाम मालुसरे (वय ४५), सनी विठ्ठल मालुसरे (वय २६), आनंदा ज्ञानेश्वर जाधव (वय ५५ ), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय ३६) अशी मृत्यू झालेली चौघांची नावे आहेत.

निगडे धांगवडी येथे गुंजवणी नीरा नदीपात्रात (River Bed) पाण्याची मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आल्याने पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे बाप लेकासह चार जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी दाखल होत पुढील तपास (investigation) सुरु केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com