
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
चांदवड तालुक्यातील (Chandwad Taluka) नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) कार व कंटेनर (Car and Containers) यांच्यात भीषण अपघात (A Terrible Accident) झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सोमवार (दि.१८ सप्टेंबर) रोजी सकाळी साडे सातवाजेच्या सुमारास हा अपघात घडला असून अपघातातील मयत हे नाशिककडून धुळे येथे चालले होते. त्यावेळी चांदवड तालुक्यातील नमोकार तीर्थक्षेत्रा (Namokar Pilgrimage) समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात घडला असून यात कारमधील चार जण जागीच ठार झाले.
दरम्यान, अपघातातील मयत हे धुळे जिल्ह्यातील (Dhule District) रहिवाशी असल्याची माहिती समोर आली असून अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. तसेच अपघातस्थळी वडनेरभैरव पोलीस (Vadnerbhairav Police) व सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक पोहचले आहे. या अपघातानंतर काही वेळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.