एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; विष घेत आयुष्य संपवलं

पती-पत्नीसह दोन मुलांचा समावेश
आत्महत्या
आत्महत्या

पुणे | Pune

पुणे शहरात (Pune City) एक धक्कादायक आणि खळबळ उडवणारी घटना समोर आली. एकाच कुटुंबतील चौघांनी विष प्राशन करत जीवन संपवल्याचा (family committed suicide) प्रकार घडला.

पुण्यातील मुंढवा भागात एकाच कुटुंबातील चौघानी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे. दरम्यान, या घटनेचा पुणे पोलीस अधिक तपास करत आहे.

आत्महत्या
'मामा' रुग्णालयात असतांना फडणवीसांनी केले काँग्रेसमधील 'ऑपरेशन'

दीपक थोटे ( वय ५९), इंदू दीपक थोटे ( वय ४५), ऋषिकेश दीपक थोटे (वय २४), समीक्षा दीपक थोटे (वय १७, चौघे रा. केशवनगर, मुंढवा) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. थोटे कुटुंबीय मूळचे अमरावतीचे आहे. दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते.

ही आत्महत्या नेमकी कोणत्या वेळी करण्यात आली त्याची अद्याप माहिती मिळालेली नाही. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला आणि त्यांनीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली माहिती मिळताच मुंढवा पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. चारही व्यक्तींचे. मृतदेह शवविच्छेदनासाठी (Mundhwa Case) रुग्णालयात पाठवले आहेत. ही आत्महत्या आहे की घातपात आहे. याची चौकशी मुंढवा पोलिस करत आहेत.

आत्महत्या
'डेथ मिस्ट्री' : MIDC हद्दीत आठ दिवसात दुसऱ्यांदा आढळला कुजलेला मृतदेह

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तब्बल नऊ लोकांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुण्यातील मुंढव्यातही अशीच घटना घडल्यामुळं अनेकांना धक्का बसला आहे.

आत्महत्या
शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याची खासदारकी रद्द; नेमकं काय आहे प्रकरण?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com