Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक मनपात पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचना; नगरसेवक संख्या होणार कमी

नाशिक मनपात पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचना; नगरसेवक संख्या होणार कमी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाविकास आघाडीने ( Mahavikas Aaghadi Government ) तयार केलेल्या त्रिसदस्य प्रभाग रचना रद्द करून तसेच नाशिक महापालिकेत 11 नगरसेवक यांची वाढ रद्द करीत 2017 प्रमाणे निवडणुका घेण्याच्या निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आला.

- Advertisement -

यामुळे नाशिक मध्ये पुन्हा 122 नगरसेवक ( Corporators )राहणार आहे, यामुळे अनेक इच्छुकांमध्ये नाराजी दिसुन येत आहे. दुसरीकडे ज्यांचे वार्डांची कटिंग झाली होती. त्यांना मात्र जीवदान मिळाल्याचे दिसून येत आहे, तरी आगामी काळात काय अंतिम निर्णय होतो याकडे देखील लक्ष लागले आहे.

2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत नाशिक महापालिकेत अकरा नगरसेवकांची वाढ होऊन 122 वरून नगरसेवक संख्या 133 झाली होती. तसेच याप्रमाणे आरक्षण सोडत, महिला आरक्षण, प्रभाग रचना व अंतिम मतदार यादी देखील प्रसिद्ध झाली आहे. मात्र राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे पुन्हा चार सदस्य प्रभाग रचना करण्यात आली आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे.

पुन्हा चार सदस्य प्रभाग रचना झाल्याने नाशिक मध्ये पुन्हा 122 नगरसेवक संख्या राहणार आहे. चार सदस्य प्रभाग रचना ही भारतीय जनता पक्षाला पोषक आहे. म्हणून 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत याच पद्धतीने निवडणूक झाल्या होत्या तर नाशिक महापालिकेत कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात तब्बल 66 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले होते.

यामुळे भारतीय जनता पक्षाच्या हातात एक हाती सत्ता महापालिकेची होती. मात्र 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय नाट्य रंगले होते. तर महाविकास आघाडीचे सरकार निर्माण झाले. यामुळे नव्याने त्रीसदस्य प्रभाग रचना करण्यात आली. मात्र मागील महिन्यात पुन्हा सत्तांतर होऊन भारतीय जनता पक्षची सत्ता आली व राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनले आहे. यामुळे पुन्हा चार सदस्य प्रभाग रचना करण्याचत आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या