Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याबापरे! मोहाडीत सलग चार दिवसांत चार बिबटे जेरबंद

बापरे! मोहाडीत सलग चार दिवसांत चार बिबटे जेरबंद

जानोरी | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे सलग चार दिवसांत चार बिबटे जेरबंद करण्यात आल्यामुळे परिसर बिबट्याच्या दहशतीखाली आहे. नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे तर नागरिकांनी घाबरून न जाता बिबट्याचा संचार दिसल्यास वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, कोराटे रस्त्यावरील संतोष तिडके यांच्या शेताच्या बांधावर बुधवारी दिड वर्ष वयाचा एक बिबट्या जेरबंद झाला होता. त्यासोबत अजूनही काही बिबटे असल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती.

त्यानुसार पुन्हा पिंजरा लावण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा सहा वर्ष वयाचा दुसरा बिबट्या जेरबंद झाला.

यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा दिड वर्ष वयाचे दोन बछडे जेरबंद झाल्याने सलग चार दिवसांत चार बिबटे पिंजऱ्यात जेरबंद झाल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

परिसरात आणखी बिबटे असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. दिंडोरी तालुक्यात १८ जूनपासून ९ बिबटे जेरबंद करून ते इतरत्र सोडण्यात आले आहेत.

या बिबट्यांनी १०० च्या वर पशु प्राण्यांवर हल्ले केले असून १० मानवी हल्ले व ५ मानवी बालकांच्या मृत्यूची नोंद असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या