चाकूचा धाक दाखवून उद्योजकाकडून चार लाखांचे दागिने लुटले

चाकूचा धाक दाखवून उद्योजकाकडून चार लाखांचे दागिने लुटले

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

सायंकाळच्या सुमारास पाय मोकळे करण्यासाठी फिरायला गेलेल्या महेंद्रकुमार लक्ष्मीनारायण मंडारे (वय 64) रा. नवीपेठ या उद्योजकाला

शेतातील पिकात लपुन बसलेल्या दोघांनी पोटाला चाकू लावून 80 हजार रुपयांची रोकड व दागिणे असा, चार लाख 12 हजार 500 रुपयांची ऐवज लुटल्याची घटना सोमवारी सायंकाळी कानळदा रस्त्यावर घडली. याप्रकरणी मध्यरात्री तालुका पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्योजक महेंद्रकुमार मंडोरा यांची जळगाव तालुक्यातील कानळदा रस्त्यावरील तुरखेडा शिवारात इंदूमोती प्रा.लि. नावाची कंपनी आहे.

या कंपनीत जवळपास सव्वाशे मजूर कामाला आहेत. मंडोरे कंपनीच्या परिसरातील शेतात दररोज सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या सुमारास फिरण्यासाठी जात असतात.

नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळीदेखील ते कानळदा गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर पायी चालत गेले. तिकडून परत येत असतांना रस्त्यावरील कापसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या दोघांनी मंडोरे यांच्या पोटाला चाकू लावला व तेरे पास क्या है निकाल असे सांगत हाताच्या मनगटावर असलेले 1 लाख 57 हजार 500 रुपये किंमतीचे 63 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रॉसलेट, 1 लाख 37 हजार रुपये किंमतीची 55 ग्रॅम सोनसाखळी तसेच हाताच्या करंगळ्यांमध्ये असलेल्या 37 हजार 500 रुपये किंमतीची सोन्याची अंगठी व 80 हजार रुपयांची रोकड लंपास केली.

दरम्यान या दोघ चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला असल्यामुळे मंडोरा त्यांना ओळखू शकले नाही. याप्रकरणी मंडोरा यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com