विदेशी चार लसींना भारतात मान्यता?

विदेशी चार लसींना भारतात मान्यता?

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

करोनाविरुद्ध लढण्यासाठी रशियानंतर आता अमेरिका, जपान आणि ब्रिटनमधूनही लस आयात केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून परदेशात विकसीत करण्यात आलेल्या लसींना आयात केले जाणार आहे.

‘कोव्हॅक्सिन’, ‘कोव्हिशिल्ड’ या ‘मेड इन इंडिया’ लसीनंतर ‘स्पुटनिक व्ही’ या पहिल्या परदेशी लसीला भारतात सोमवारी मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता इतर चार परदेशी लसींचीही भारतात आयात केली जाणार आहे.

भारतात सुरू असलेल्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेतील अडथळे दूर करण्यासाठी आणि लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी परदेशांमध्ये विकसीत करण्यात आलेल्या आणि वेगवेगळ्या देशांत आपात्कालीन मंजुरी मिळवलेल्या करोना लसींची आयात केली जाणार आहे. नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड 19 या तज्ज्ञांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत सहभागी झालेल्या आणि इतर देशांत आपत्कालीन मंजुरी मिळालेल्या लसींना भारतातही आपत्कालीन मंजुरी देण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या समितीचा हा प्रस्ताव भारत सरकारकडूनही मान्य करण्यात आला आहे. एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड 19 या तज्ज्ञांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत सहभागी झालेल्या आणि इतर देशांत आपत्कालीन मंजुरी मिळालेल्या लसींना भारतातही आपत्कालीन मंजुरी देण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या समितीचा हा प्रस्ताव भारत सरकारकडूनही मान्य करण्यात आला आहे.परदेशातून आयात केल्या जाणार्‍या लसीचा वापर अगोदर केवळ 100 लोकांवर केला जाईल. तसेच पुढचे 7 दिवस त्यांच्यावर तज्ज्ञांचे लक्ष राहील. त्यानंतर या लसींचा वापर लसीकरण मोहिमेत केला जाईल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com