भीषण अपघातात तीन बालिकांसह एका युवकाचा जागीच मृत्यू

भीषण अपघातात तीन बालिकांसह एका युवकाचा जागीच मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी Nashik

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव (Mundegaon Tal Igatpuri) येथील चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ट्रकने कट मारल्याने ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून समजते...

हा अपघात घोटीहून मुंढेगावकडे येत असताना झाला. यामध्ये 3 बालिका आणि 1 युवक ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले आहेत. या घटनेमुळे मुंढेगाव परिसर आणि इगतपुरी तालुक्यात शोककळा पसरली आहे. याबाबत घोटी पोलिसांनी नोंद घेतली असून तपास कार्य सुरु केले आहे.

भीषण अपघातात तीन बालिकांसह एका युवकाचा जागीच मृत्यू
देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' आरोपानंतर हसीना पारकर पुन्हा चर्चेत, जाणून घ्या तिच्याविषयी

अधिक माहिती अशी की, मुंढेगाव येथील तुषार हटी कडू (वय 24) हा युवक दुचाकीने घोटीला दिवाळीनिमित्त काही खरेदी करण्यासाठी पायल ज्ञानेश्वर गतीर वय 11, विशाखा ज्ञानेश्वर गतीर वय 8 रा. मुंढेगाव, ईश्वरी हिरामण डावखर वय 10 रा. गिरणारे ता. इगतपुरी यांना घेऊन घोटीला गेला होता.

तिकडून गावाकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने हुलकावणी दिली. यामध्ये मोटारसायकलीवरील चौघेही खाली पडले. त्यात सर्वांच्या अंगावरून ट्रक गेल्याने चौघे चिरडले गेले.

या घटनेने मुंढेगाव हादरून गेले. परिसरातील नागरिकांनी अपघात ग्रस्तांना मदत केली. तर गावात दुखामय वातावरण निर्माण झाले होते. घोटी ग्रामिण रुग्णालयात जखमींना आणण्यात आल्याची माहिती मिळताच नागरिक, आप्तस्वकीयांनी एकच गर्दी करत हंबरडा फोडला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास या करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com