मनमाडनजीक भीषण अपघात; कार्यक्रमाहून परतत असलेल्या चार मित्रांचा जागीच मृत्यू

मनमाडनजीक भीषण अपघात; कार्यक्रमाहून परतत असलेल्या चार मित्रांचा जागीच मृत्यू

मनमाड | प्रतिनिधी Manmad

पुणे-इंदौर मार्गावर (Pune Indor highway) मनमाडच्या (Manmad) अंकाई किल्ल्या जवळ झालेल्या भीषण अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे....

अधिक माहिती अशी की, पाच मित्र मारुती सियाज कार मधून येवल्याकडून मनमाडला येत होते. समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने कट मारल्यामुळे चालकााचे नियंत्रण सुटले.

यानंतर कार थेट झाडावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला आहे. त्यातील 5 पैकी तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी असून त्याला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच मयताच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात (CIVIL HOSPITAL) गर्दी केली. तिकडे अपघातामुळे पुणे-इंदौर महामार्गावरील (Pune Indor highway) वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व मृतदेह आणि जखमीला हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर वाहतूक सुरळीत केली.

Related Stories

No stories found.