Accident News : देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू, पाच जखमी

Accident News : देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू, पाच जखमी

सातारा | Satara

जिल्ह्यातील सुर्याचीवाडी (Suryachiwadi) येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या (Devotees) गाडीचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू (Death) झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याच्या (Satara) खटाव तालुक्यातील (Khatav Taluka) सिद्धेश्वर कुरोली येथील एका व्यक्तीच्या मारुती ओमनी गाडीतून कुरोली व बनपुरी येथील काही भाविक लोकरेवाडी येथे श्री संत बाळूमामांच्या दर्शनासाठी जात होते.

Accident News : देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू, पाच जखमी
पाकिस्तानात मोठी घडामोड! मध्यरात्री संसद बरखास्त, राष्ट्रपतींचा निर्णय

त्यावेळी खटाव ते मायणी सुर्याचीवाडीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने ओमनी गाडी झाडावर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अपघातात पाच जण जखमी (Injured) झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी (Satara Police) घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले होते. तर स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Accident News : देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू, पाच जखमी
राज्यात मतदान केंद्रांची संख्या वाढणार
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com