नाशिकसह राज्यात चार ठिकाणी वाहन स्क्रॅपिंग केंद्र

नाशिकसह राज्यात चार ठिकाणी वाहन स्क्रॅपिंग केंद्र

सातपूर | प्रतिनिधी Satpur

राज्यातील चार शहरात स्टिलच्या पुनर्वापरासाठी सुसज्ज केंद्र उभारण्यात येणार असून, नाशिक, औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर येथे दूचाकी आणि तीन चाकी वाहनांचे स्क्रॅपिंग केले जाणार आहे....(two and three wheeler vehicle scrapping center in maharashtra)

महाराष्ट्र सरकारने उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागामार्फत महिंद्रा रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड (सिरो ) (mahindra cero recycling) सोबत यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन हे उद्दिष्ट सिरोने ठेवलेले आहे.

राज्यातील हे केंद्रे ग्राहकांना त्यांची वाहने पर्यावरणपूरक रीतीने स्क्रॅप (Scrap) करण्यात येतील त्या ग्राहकांना नवीन वाहनांच्या खरेदीवर लाभ मिळवण्यासाठी ते सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटशी जोडले जाणार आहे.

टिकाऊपणाच्या दृष्टिकोनातून जुन्या वाहनांच्या पुनर्वापराद्वारे भारताचे अवलंबित्व कमी करण्याचे ध्येय सिरोने ठेवलेले आहे. स्टील भंगार आयात आणि स्टीलच्या उत्पादनात जाणार्‍या नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यावर विशेष भर असल्याचे या सामंजस्य करारावर बोलताना महिंद्रा अ‍ॅक्सेलोचे व्यवस्थापकीय संचालक सुमित इस्सार यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डने (CPCB) केलेल्या सर्व कायदेशीर आणि पर्यावरणीय नियमांनुसार व मार्गदर्शक तत्त्वांनुसार या प्रस्तावित स्क्रॅपेज केंद्रांमध्ये दूचाकी व तिनचाकी प्रवासी-व्यावसायिक वाहनांचे स्क्रॅपिंग व पुनर्वापर करण्याची क्षमता राहणार आहे. . वर्षाला चाळीस हजार वाहने येथे स्क्रॅप करर्‍याची क्षमता या प्रकल्पांमध्ये असल्याचे इस्सार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com