उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचं निधन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचं निधन

मोदींनी व्यक्त केला तीव्र शोक

दिल्ली | Delhi

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंग यांचं आज निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते. (Uttar Pradesh Former CM Kalyan Singh Passes Away)

४ जुलैपासून कल्याण सिंग यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान कल्याण सिंग यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. कल्याण सिंह यांच्या निधनाने भाजपने राम मंदिर आंदोलनातील एक प्रमुख नेता गमावला आहे.

कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत कल्याण सिंह यांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनाने एक कुशल नेता, कर्तव्यकठोर प्रशासक आणि तळागाळातील जनतेशी नाळ जुळलेला नेता आम्ही गमावला आहे, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com