माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे करोना संसर्गाने निधन
मुख्य बातम्या

माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे करोना संसर्गाने निधन

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई | प्रतिनिधी

राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे करोनाची बाधा झाल्याने निधन झाले. निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. नीला सत्यनारायण १९७२ आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या.

करोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आज पहाटे चारच्या सुमारास उपचारास प्रतिसाद न दिल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नीला सत्यनारायण या आपल्या लेखनातून नेहमी व्यक्त होत राहिल्या होत्या. कवयित्री म्हणून त्या अधिक परिचित होत्या.

त्यांचे स्तंभलेखनही पसंतीला उतरले होते. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून पुस्तकांचे लिखाण केले होते. तसेच १५० हून अधिक कविता लिहिल्या. त्यांच्या काही पुस्तकांवर चित्रपटदेखील तयार झाले.

Deshdoot
www.deshdoot.com