RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन भारत जोडो यात्रेत; राजकीय चर्चांना उधाण

RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन भारत जोडो यात्रेत; राजकीय चर्चांना उधाण

राजस्थान | Rajasthan

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. राजस्थान येथील सवाई माधोपूर येथील भदोती येतून आज सकाळी यात्रेस सुरुवात झाली. यावेळी रघुराम राजन काही वेळासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यावरुन आता नव्या चर्चांना उधाण आले आहे.

भारत जोडो यात्रेची सुरुवात झाल्यापासून काँग्रेस पक्षाचे सदस्य नसलेले हजारो लोक या यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत. रघुराम राजन हेदेखील बुधवारी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर आता नवीन चर्चांना उधाण आले आहे. रघुराम राजन काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहेत.

राहुल गांधी आणि रघुराम राजन यांच्यात अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली. एका डॉक्युमेंटरीसाठी दोघांनीही आर्थिक मुद्द्यांवर आपली मते मांडली. यूपीएच्या दुसऱ्या कार्यकाळात रघुराम राजन यांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनवण्यात आले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com