
दिल्ली | Delhi
माजी पोप बेनेडिक्ट सोळावे (XVI) यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. वयाशी संबंधित आजारांमुळे त्रस्त होते. व्हॅटिकन चर्चच्या प्रवक्त्यांकडून याबाबत एक निवेदन जाहीर करण्यात आले आहे. ज्यात माजी पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे व्हॅटिकनमधील मेटर एक्लेसिया मठात सकाळी ९:३४ वाजता निधन झाल्याचे म्हटले आहे.