कोरोनाशी लढाईसाठी मनमोहन सिंग यांनी मोदींना सांगितले 'हे' ५ उपाय

कोरोनाशी लढाईसाठी मनमोहन सिंग यांनी मोदींना सांगितले 'हे' ५ उपाय

नवी दिल्ली

देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात मनमोहन सिंग यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी काही उपायही सूचवले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

१) लशींचे नियोजन कसे करावे?

वेगवेगळ्या लसनिर्मिती कंपन्यांकडे किती डोसेसची ऑर्डर देण्यात आली आहे हे सरकारने जाहीर करावे. जर आपण या ६ महिन्यांच्या काळात निश्चित करण्यात आलेल्या नागरिकांचे लसीकरण केले तर आपल्याला आणखी डोसची ऑर्डर देणे आवश्यक आहे. जेणेकरुन लसींचे डोस आपल्याकडे उपलब्ध असतील.

२) केंद्र सरकार- राज्य सरकार यांच्यात समन्वय

लशींचा संभाव्य पुरवठ्याचे राज्यांमध्ये पारदर्शक सूत्रानुसार कसे वाटप होईल, याचे सरकारने संकेत द्यायला हवेत.

३) फ्रंटलाईन वर्कर्सची व्याख्या विस्तृत करावी

केंद्र सरकारने सर्व राज्यांना फ्रंटलाईन वर्कर्सची श्रेणी निश्चित करण्याची सूट द्यायला हवी. जेणेकरुन अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या फ्रंटलाईन वर्कर्सला सुद्धा लस मिळेल जे ४५ वर्षांहून कमी वयाचे आहेत आणि ज्यांना राज्य सरकारने फ्रंटलाईन वर्कर्सच्या श्रेणीत समावेश केले आहे.

४) एक परवाना तरतूद लागू करावी

गेल्या काही दशकात भारत सर्वांत मोठा लसनिर्माता देश म्हणून पुढे आला. मात्र, ही क्षमता अधिकाधिक खासगी क्षेत्रात आहे. सार्वजनिक आरोग्याच्या या आपत्कालीन स्थितीत सरकारनं निधी आणि काही सवलत देऊन लसनिर्मात्यांना अधिकाधिक मदत केली पाहिजे.

यामुळे ते उत्पादन सुविधा वाढवू शकतील. त्याशिवाय, मला वाटते की, ही वेळ एक अनिवार्य परवाना तरतूद लागू करण्याची आहे, यामुळे कंपन्या एका परवान्यानुसार लस बनवू शकतील.

५) लशींची आयात करावी

जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश म्हणून भारत उदयास आला आहे. त्याचे मी कौतुक करतो. लस उत्पादक कंपन्यांना सरकारने आवश्यक निधी आणि इतर सहाय्य पुरवावे जेणेकरुन लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू राहील. अशा परिस्थितीत कायद्यातही आवश्यक परवान्यांची तरतूद आणली पाहिजे जेणेकरुन अधिकाधिक कंपन्यांना परवाना मिळेल आणि लस निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. सध्या देशात लस पुरवठा मर्यादित होत आहे. अशा परिस्थितीत जर जगातील इतर विश्वसनीय लसीला मंजूरी मिळाली असेल तर ती लस आपण आयात करायला हवी. आपण भारतात त्याची चाचणीशिवाय असे करु शकतो. यावेळी भारत आपत्कालीन परिस्थितीत आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्याचा उपयोग करताना देशात त्याची चाचणी सुद्धा करता येऊ शकते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com