'या' माजी आमदारचा भाजपात प्रवेश

'या' माजी आमदारचा भाजपात प्रवेश

मुंबई | Mumbai

शेतकरी कामगार पक्षाचे (shetkari kamgar party) पेण विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार धैर्यशील पाटील भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर अनेक आजी नेते- कार्यकर्ते विविध पक्षातून शिंदे गट किंवा भाजप या पक्षांकडे आकर्षित झाल्याचे दिसून येत आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय पातळीवर अनेक ठिकाणी इनकमिंग-आउटगोइंग सुरु आहे या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एका नेत्याने भाजपात प्रवेश केला असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

शेतकरी (farmer) कामगार पक्षाचे पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश केला. शेकापची मुलूखमैदानी तोफ म्हणून या नेत्याची ओळख आहे. त्यामुळे भाजपचा रायगडमधील (Raigad) लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून या नेत्याकडे बघितले जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पेणचे आमदार रविशेठ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व भाजप नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत धैर्यशील पाटील यांनी मुंबई येथे जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत पेण विधानसभा मतदार संघातील ५०० हुन अधिक प्रमुख पदाधिका-यांनीही प्रवेश केला आहे.

'या' माजी आमदारचा भाजपात प्रवेश
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com