माजी मंत्री संजय देशमुखांच्या हाती शिवबंधन; उद्धव ठाकरे म्हणाले...

माजी मंत्री संजय देशमुखांच्या हाती शिवबंधन; उद्धव ठाकरे म्हणाले...

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी (MLA) बंडखोरी (Rebel) केल्यानंतर शिवसेना (Shivsena)पक्षात उभी फूट पडली. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray Group) शिंदे गटातील नेत्यांना रोखण्यासाठी अन्य नेत्यांना बळ देण्याचा प्रयत्न सुरु आहे...

आज यवतमाळमधील नेते आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी महत्वाची घोषणा केली आहे.

ते म्हणाले, की सध्या माझी भूमिका शिक्षकासारखी (Teacher) झाली आहे. कारण बोलणारा मी एक आणि ऐकणारे विद्यार्थी खूप आहेत. ज्या ज्यावेळी शिवसेनेवर आघात झाले तेव्हा शिवसेना दहापट मोठी होती, असे त्यांनी म्हटले. तसेच मी पोहऱा देवीला (Pohra Devi) मेळावा घ्यायचे जाहीर केले आहे. आता मी ठाण्यात (Thane) पण घेईल. हा आवाज बुलंद होत आहे. तुम्ही ठाण्यात सभा लावा, मी आलोच म्हणून समजा. कोणतेही शहर लोकप्रतिनिधींच्या शिवाय राहणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

तर अंधेरी पोटनिवडणुकीवरून (Andheri by-election) उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP)आणि राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला. ते म्हणाले, की 'कोणी विनंती करतंय काय हे बघत होते. मग कोणाला तरी उभा करून विनंती करवून घेतली. म्हणजे विनंती करण्यासाठी विनंती केली गेली. तोंडावर आपटण्यापेक्षा पळालेले बरं, असं त्यांना वाटलं. मग माझं नाव आणि चिन्ह गोठवण्याची घाई का केली?' असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com