ना.गुलाबराव पाटील सर्वात भ्रष्ट मंत्री

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची टीका
माजी मंत्री गुलाबराव देवकर,पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
माजी मंत्री गुलाबराव देवकर,पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव - jalgaon

कवयित्री बहिणाबाई स्मारकाच्या कामावरून जिल्ह्यातील दोन्ही गुलाबरावांमध्ये जोरदार जुंपली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे राज्यातील सर्वात भ्रष्ट मंत्री असल्याची टीका माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज जळगाव येथे केली.

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पालकमंत्री ना.पाटील यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. गुलाबराव देवकर म्हणाले की, कवयित्री बहिणाबाई आणि बालकवी ठोंबरे हे खरगटं आहे का? या दोन्ही महानुभावांची स्मारके बनविण्यात नऊ वर्षे पालकमंत्र्यांची बोंब पडली नाही. याउलट त्यांच्या आशीर्वादाने जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जलजीवन मिशनच्या कामामध्ये कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार केला जात आहे. राज्यभरातील टेंडरचे अधिकार आपल्याला मिळावे म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील हे अजित पवारांच्या पाया पडले होते. या टेंडरच्या माध्यमातून पाच टक्के रक्कम घेण्याचे प्रकार सुरू आहेत. गेल्या नऊ वर्षात मंत्रीपदावर असतांना पालकमंत्र्यांनी किती संपत्ती जमा केली आहे ते सांगावे? सालदाराच्या मुलाची आज आर्थिक स्थिती काय आहे? ते जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. घोडामैदान जवळ आले आहे त्यामुळेच पालकमंत्री अशी विधाने करीत असल्याचा आरोप गुलाबराव देवकर यांनी केला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com